सिग्नल पार करताना खड्ड्याचा अडथळा
खारघरमध्ये सिग्नल पार करताना खड्ड्याचा अडथळा
अपघाताचा धोका वाढला
खारघर, ता. २५ (बातमीदार) : पनवेल–शिळफाटा मार्गावरील शीघ्र कृती दल चौक येथील सिग्नल पार करताना रस्त्यालगत पडलेल्या धोकादायक खड्ड्यामुळे वाहनचालकांना मोठा अडथळा निर्माण होत आहे. सिग्नलसाठी अवघा ३० सेकंदांचा वेळ असताना खड्ड्यांमुळे वाहतूक विस्कळीत होत असून अपघाताचा धोका वाढला आहे.
तळोजा वसाहतीत प्रवेश व बाहेर पडताना या चौकात नेहमीच वाहनांची मोठी गर्दी असते. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी येथे सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली आहे. मात्र खारघरकडून मुंब्रा व शिळफाटा दिशेला जाताना सिग्नललगतचा रस्ता पूर्णपणे उखडल्याने वाहनचालकांना खड्डे चुकवत मार्ग काढावा लागत आहे.
घाईत सिग्नल ओलांडताना वाहन खड्ड्यात अडकून अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे.
चौकट
वाहतूक वाढीपूर्वी दुरुस्तीची गरज
पाच दिवसांत खारघरमध्ये होणाऱ्या “हिंद दी चादर” कार्यक्रमामुळे या मार्गावरील वाहनांची वर्दळ आणखी वाढणार आहे. त्यामुळे संभाव्य अपघात व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पालिकेने तातडीने खड्डे बुजवून रस्ता सुरळीत करावा, अशी मागणी तळोजा वासीयांकडून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

