यूफोरिया: झिलेनियल युगातील नवे आध्यात्मिक एंटरटेनमेंट मूव्हमेंट
‘यूफोरिया’च्या पहिल्या कार्यक्रमाला मुंबईकरांचा प्रतिसाद
मुंबई, ता. २५ : अहमदाबादमधील दोन यशस्वी प्रयोगांनंतर ‘यूफोरिया सीएचपी पार्थ’ने मुंबईत आपला पहिला कार्यक्रम सादर केला आहे. झिलेनियल पिढीसाठी नव्या आध्यात्मिक एंटरटेन्मेंट मूव्हमेंटची झलक या कार्यक्रमात पाहण्यास मिळाली असून, मुंबईकरांनीही त्याला चांगला प्रतिसाद दिला. तसेच या कार्यक्रमात जगातील पहिला हेक्झामर्सिव टीएम व्हिज्युअल-कॉन्सर्ट अनुभव सादर करण्यात आला.
हृतुल यांच्या संकल्पना आणि दिग्दर्शनातून साकारलेल्या या कार्यक्रमात सहा-स्क्रीनच्या षटकोनी मांडणीद्वारे सुमारे ३६० अंशांचा दृश्य अनुभव उभा करण्यात आला होता. कथेनुसार हालचाल करणाऱ्या, विभाजित होणाऱ्या आणि पुन्हा एकत्र येणाऱ्या भव्य स्क्रीनमुळे प्रेक्षकांना कथा ‘पाहण्यापेक्षा’ तिचा प्रत्यक्ष भाग असल्याचा अनुभव मिळाला. अहमदाबादमधील दमदार प्रतिसादानंतर मुंबईतील पदार्पण सोहळ्यालाही प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ध्वनी, प्रकाश आणि गतिमान दृश्य मांडणीच्या संगमातून साकारलेला हा प्रयोग आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नव्या स्टोरीटेलिंग प्रकाराची प्रभावी ओळख ठरला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

