‘माझी वसुंधरा ६.०’ अंतर्गत शाळांमध्ये पर्यावरण जनजागृती
‘माझी वसुंधरा ६.०’ अंतर्गत शाळांमध्ये पर्यावरण जनजागृती
पनवेल महापालिकेचा पुढाकार; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
पनवेल, ता. २५ (बातमीदार) : पनवेल महानगरपालिकाच्या वतीने शासनाच्या “माझी वसुंधरा ६.० – पर्यावरण सेवा योजना” अंतर्गत शहरातील विविध शाळांमध्ये पर्यावरण जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त स्वरूप खारगे यांच्या सूचनेनुसार हा उपक्रम राबविण्यात आला.
पालिका शाळा क्र. ७ तक्का, पालिका उर्दू स्कूल पनवेल, सावित्रीबाई फुले शाळा, जिल्हा परिषद उर्दू स्कूल ओवे पेठ, मोर्बी खारघर, कोपरा येथील शाळांमध्ये हवामान बदल, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन या विषयांवर परिसंवाद, निबंध स्पर्धा तसेच ‘बेस्ट आऊट ऑफ वेस्ट’ स्पर्धा घेण्यात आल्या. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना हवामान बदलाचे परिणाम, कचरा व्यवस्थापनाचे महत्त्व व प्लास्टिकमुक्त जीवनशैलीचा संदेश देण्यात आला.
जलसंवर्धन, वृक्षारोपण, ऊर्जा बचत आणि जैवविविधता संवर्धन या घटकांवर भर देत पर्यावरणपूरक पनवेल घडविण्याचा महापालिकेचा संकल्प असून नागरिकांनीही या मोहिमेत सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

