हिंद-दी-चादर’ आरोग्य शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
हिंद-दी-चादर’ आरोग्य शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
१२४ शिबिरांत विविध आजारांचे मोफत निदान; ४२७ जणांची तपासणी
नेरूळ, ता. २५ (बातमीदार) : नागरिकांच्या सर्वांगीण आरोग्याच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात १० ते २५ फेब्रुवारीदरम्यान राबविण्यात येत असलेल्या “हिंद-दी-चादर” अभियानाअंतर्गत आरोग्य शिबिरांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या अभियानात मनपा रुग्णालये व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये एकूण १२४ शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.
शिबिरांमध्ये उच्च रक्तदाब व मधुमेह तपासणी, तोंडाचा, स्तन व गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग निदान, माता-बाल आरोग्य सेवा, लसीकरण, क्षयरोग व सिकलसेल तपासणी यांसह नेत्र, त्वचा, दंत, कान-नाक-घसा व मानसोपचार तज्ज्ञांच्या सेवा देण्यात येत आहेत.
२४ फेब्रुवारी रोजी बेलापूर, जुहूगाव, सेक्टर ४८ नेरूळ, ऐरोली, कोपरखैरणे सेक्टर १६ व इंदिरानगर येथे सहा शिबिरे घेण्यात आली. या शिबिरांमधून एकूण ४२७ लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली.
चौकट
प्रतिबंधात्मक आरोग्यावर भर
या उपक्रमातून गंभीर आजारांचे लवकर निदान करून वेळेवर उपचार मिळावेत, तसेच नागरिकांमध्ये नियमित आरोग्य तपासणीची सवय लागावी, यावर विशेष भर देण्यात येत आहे. त्यामुळे आरोग्यदायी समाज घडण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

