सारसोळे गावात अनधिकृत बांधकामावर पालिकेची कारवाई
सारसोळे गावात अनधिकृत बांधकामावर पालिकेची कारवाई
नोटीस कालावधी संपल्यानंतर निष्कासन; जेसीबीच्या सहाय्याने रचना जमीनदोस्त
नेरूळ, ता. २५ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकाच्या अतिक्रमण विभागाने नेरूळ विभागातील सारसोळे गाव येथे सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई केली. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे व उपआयुक्त (अतिक्रमण) डॉ. कैलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
सेक्टर ६, प्लॉट क्रमांक ०१५२ येथे परवानगीशिवाय बांधकाम सुरू असल्याने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ५४ अंतर्गत संबंधितांना नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, दिलेल्या मुदतीत बांधकाम हटविण्यात न आल्याने नेरूळ विभाग कार्यालयाने कारवाई करत बांधकाम निष्कासित केले.
ही मोहीम सहाय्यक आयुक्त डॉ. अनुराधा बाबर यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण विभागाचे कर्मचारी, सात मजूर, दोन जेसीबी, पोलिस पथक व सुरक्षा रक्षकांच्या उपस्थितीत पार पडली.
चौकट
अतिक्रमणाविरोधात कारवाई तीव्र
पालिकेच्या कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे नियमबाह्य बांधकाम करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

