कोपर उड्डाणपूल परिसरातील कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीत मोठे बदल
कोपर उड्डाणपूल परिसरातील कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीत मोठे बदल
‘नो पार्किंग’ची कडक अंमलबजावणी; शहर वाहतूक शाखेची अधिसूचना जारी
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २५ : डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या कोपर उड्डाणपूल परिसरात दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त झाले होते. या पार्श्वभूमीवर डोंबिवली शहर वाहतूक शाखेने महत्त्वपूर्ण बदल जाहीर केले असून, त्याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. काही ठिकाणी २४ तास ‘नो पार्किंग’ची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नागरिकांनी नव्या नियोजनाचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.
उड्डाणपूल उतारावरून उजवे वळण घेऊन पश्चिमेकडे पं. दीनदयाळ चौक दिशेने जाणारी तसेच उड्डाणपूल चढल्यानंतर उजवे वळण घेऊन पूर्वेकडे आणि कोपर गाव दिशेने जाणारी वाहने पश्चिम बाजूस समोरासमोर येत होती. त्यामुळे वाहतूक कोंडीबरोबरच अपघातांची शक्यता वाढत असल्याचे वाहतूक पोलिसांच्या पाहणीत आढळले. यावर उपाय म्हणून उड्डाणपुलाच्या उतार व चढणीवरील काही उजव्या वळणांवर बंदी घालण्यात आली आहे.
१. नवीन नियोजनानुसार उड्डाणपूल उतरणीवरून दीनदयाळ रोडमार्गे पश्चिमेकडे जाणाऱ्या वाहनांना उतरणीवर उजवे वळण घेण्यास मनाई असेल. वाहनांना डावे वळण घेऊन कै. श्रीमती मीनाताई ठाकरे उद्यानमार्गे पुढे जाऊन तेजस बिल्डिंग येथे उजवे वळण घ्यावे लागेल. त्यानंतर एनएमएमटी बस स्टॉप येथे उजवे वळण घेऊन कोपर रोडमार्गे पुढे जाता येईल.
२. कोपर रोडकडून उड्डाणपूल चढणीवरून पूर्वेकडे जाणाऱ्या वाहनांना उतरणीवरून पश्चिमेकडे प्रवेश बंद राहील. या वाहनांना पुढे जाऊन जुनी डोंबिवली क्रॉस रोड येथील सेंट्रल हॉटेलशेजारी यू-टर्न घेऊन पूर्वेकडे जावे लागेल.
३. तेजस बिल्डिंगकडून मीनाताई ठाकरे उद्यानमार्गे कोपर रोडकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना तेजस बिल्डिंग येथे प्रवेश बंद असेल. या वाहनांना डावे वळण घेऊन एनएमएमटी बस स्टॉपमार्गे कोपर रोडला जोडले जाईल.
४. जुनी डोंबिवली रोडमार्गे देवी चौक येथे जाणाऱ्या वाहनांना हॉटेल सेंट्रल पॅलेस येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. वाहनांना पं. दीनदयाळ रोड व स्वामी विवेकानंद विद्यालय रोडमार्गे पुढे जाऊन देवी चौक पश्चिमेकडे वळावे लागेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

