जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

Published on

पनवेल, ता. २५ (वार्ताहर) : पतीच्या निधनानंतर मालमत्तेच्या वादातून आणि सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सततच्या छळाला कंटाळून एका ३८ वर्षीय विवाहितेने टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना उघडकीस आली आहे. पुष्पा सतीश शिरोळे, असे मृत महिलेचे नाव असून, तिने १६ फेब्रुवारीला कुलाबा येथे समुद्रात उडी टाकून आत्महत्या केली होती. याप्रकरणी कामोठे पोलिसांनी तिचे सासू, नणंद आणि दोन दिरांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पुष्पा शिरोळे यांचा विवाह २०१४ मध्ये सतीश यांच्याशी झाला होता. सतीश यांचे जून २०२३ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या दोन लहान मुलांसह कामोठे येथील फ्लॅटमध्ये राहत होत्या. पतीच्या निधनानंतर मिळणारे लाभ, विम्याचे पैसे आणि कामोठे येथील घराच्या मालकी हक्कावरून सासरच्या मंडळींनी त्यांच्याकडे तगादा लावला होता. पुष्पा यांच्या सासू कोंडाबाई शिरोळे, नणंद प्रतिभा, दीर संदीप आणि विनायक हे वारंवार पैशांची मागणी करत होते. मुंबईतील ताडदेव आणि लोअर परेल येथे स्वत:ची दुकाने आणि मालमत्ता असूनही, ही मंडळी पुष्पा यांच्याकडे असलेल्या कामोठे येथील फ्लॅटमध्ये हिस्सा मागत होती. या वादातून त्यांना सतत शिवीगाळ, मारहाण आणि मानसिक त्रास दिला जात होता. या त्रासाबाबत त्यांनी ऑगस्ट २०२३ मध्ये कामोठे पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. १६ फेब्रुवारीला सकाळी पुष्पा यांनी राहत्या इमारतीच्या टेरेसची चावी मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अयशस्वी ठरला. त्यानंतर त्यांनी आपल्या लहान मुलीला, ‘मी आता कधीच घरी येणार नाही’, असे सांगून घर सोडले. त्या बेपत्ता झाल्याची तक्रार कामोठे पोलिस ठाण्यात नोंदवली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह कुलाबा परिसरातील समुद्रात मिळून आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com