होळीमुळे पुरणपोळीला मोठी मागणी

होळीमुळे पुरणपोळीला मोठी मागणी

Published on

होळीमुळे पुरणपोळीला मोठी मागणी
घरगुती उत्पादनांना पसंती; महिलांच्या गृहउद्योगांना आर्थिक बळ
तुर्भे, ता. २५ (बातमीदार) : होळी सण जवळ येताच घरगुती पद्धतीने तयार होणाऱ्या रेडिमेड पुरणपोळीच्या मागणीत मोठी वाढ झाली असून, गृहउद्योगांना चांगली चालना मिळत आहे. पारंपरिक चव, घरगुती दर्जा आणि वेळेची बचत यामुळे नागरिकांचा कल तयार पुरणपोळ्यांकडे वाढत आहे. बदलती जीवनशैली आणि नोकरी-व्यवसायातील व्यस्ततेमुळे अनेक कुटुंबे पुरणपोळी बनवण्याऐवजी घरगुती महिलांकडून ऑर्डर देणे पसंत करीत आहेत.
होळीच्या पार्श्वभूमीवर महिला बचत गट, गृहउद्योग तसेच घरातून व्यवसाय करणाऱ्या महिलांकडे ऑर्डरचा ओघ वाढला आहे. अनेकांनी आगाऊ नोंदणी सुरू केली असून, काही ठिकाणी बुकिंग पूर्ण झाले आहे. गहू, हरभरा डाळ, गूळ व तुपाच्या वाढत्या किमतीमुळे दरात किंचित वाढ झाली असली तरी मागणीत घट झालेली नाही. सध्या घरगुती पुरणपोळी २० ते ४० रुपये प्रति नग दराने विकली जात असून, तुपासह विशेष ऑर्डर स्वीकारल्या जात आहेत.
मिठाई दुकाने आणि तयार पुरणपोळी विक्री केंद्रांनाही चांगला प्रतिसाद मिळत असून, सणासुदीच्या बाजारात उत्साहाचे वातावरण आहे.
चौकट
महिलांसाठी उत्पन्नाचा नवा मार्ग
घरगुती पुरणपोळीच्या वाढत्या मागणीमुळे अनेक महिलांना घरबसल्या रोजगार उपलब्ध झाला आहे. कमी भांडवलात सुरू होणारा हा व्यवसाय बचत गटांसाठी आर्थिक स्वावलंबनाचा आधार ठरत असून, सणासुदीच्या काळात कुटुंबाच्या उत्पन्नास भरीव हातभार लागत आहे. त्यामुळे पारंपरिक पदार्थांसोबतच महिलांच्या उद्योजकतेलाही नवी ओळख मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com