मलंगगड फ्युनिक्युलरवरून नवा वाद
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २५ : श्री मलंगगड येथील फ्युनिक्युलर रोपवे प्रकल्प पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. एका बेजबाबदार व्यक्तीने रोपवेची ऑपरेटिंग सिस्टीम हाताळल्याचे समोर आले आहे. तसेच त्याने या प्रकरणाचा व्हिडिओ समाजमाध्यमावर प्रसारितदेखील केल्याची बाब उघडकीस आली आहे. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रोपवेच्या सुरक्षेविषयी गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. याप्रकरणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.
रोपवे प्रकल्पाशी अधिकृतरीत्या संबंधित नसतानाही एका व्यक्तीने बेकायदा फ्युनिक्युलर रोपवेच्या ऑपरेटिंग सिस्टीमचा ताबा घेतल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या प्रकाराचा व्हिडिओ त्याने स्वतःच्या इन्स्टाग्राम खात्यावर अपलोड केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते मंगेश भोईर यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसेच ठाणे जिल्हाधिकारी आणि ठाणे पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल करून तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
श्री मलंगगड यात्रेपूर्वी महाराष्ट्रातील सर्वात लांब फ्युनिक्युलर सेवेचे लोकार्पण करण्यात आले होते. भाविकांच्या सोयीसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा असल्याचे सांगण्यात आले होते. यात्रेच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात भाविक येथे दाखल होत असताना सुरक्षेच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष झाल्याचा दावा तक्रारीतून पुढे आला आहे. भोईर यांनी संबंधित व्यक्तीविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी तसेच रोपवे प्रकल्पाच्या सुरक्षा व्यवस्थेची तपासणी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

