महावितरण तंत्रज्ञावर काठीने हल्ला

महावितरण तंत्रज्ञावर काठीने हल्ला

Published on

अंबरनाथ (वार्ताहर) : देयकाच्या वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञावर एका व्यक्तीने काठीने हल्ला केल्याची घटना अंबरनाथमध्ये बुधवारी (ता. २५) घडली. चार महिन्यांपूर्वी वीजमीटर काढल्याच्या रागातून हा हल्ला झाल्याची तक्रार जखमी अधिकाऱ्याने केली आहे. याप्रकरणी अंबरनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात केला आहे.

अंबरनाथ पश्चिमेतील फॉरेस्ट नाका परिसरात महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ रतीलाम सपकाळे हे आज सकाळी दैनंदिन वसुलीच्या कामासाठी गेले होते. एका ग्राहकासोबत बोलत असताना शेजारी राहणाऱ्या दत्ता जाधव याने चार महिन्यांपूर्वी काढलेल्या वीजमीटरच्या कारणावरून आणि स्मार्ट मीटर जोडणीवरून बाचाबाची करीत हुज्जत घातली. या वेळी स्मार्ट मीटरसंदर्भात काही गैरसमज असल्यास कार्यालयात येऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचा सल्ला सपकाळे यांनी दिला असता, त्याने संतापून त्यांच्यावर काठीने हल्ला करीत मारहाण आणि शिवीगाळ केल्याचे तक्रारीमध्ये म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com