वसईतील पाणी समस्येवर तोडगा

वसईतील पाणी समस्येवर तोडगा

Published on

वसईतील पाणीसमस्येवर तोडगा
अमृत योजनेच्या कामाला गती, रहिवाशांना दिलासा
वसई, ता. २५ (बातमीदार) ः शहराच्या पूर्वेकडील भागांची पिण्याच्या पाण्याची समस्या निकाली निघावी, यासाठी वसई-विरार पालिकेकडून जानकी पाडा येथे अमृत योजना २.० अंतर्गत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे या भागातील पाण्याची समस्या सुटणार आहे.
प्रभाग क्रमांक २१ येथील रहिवासी वस्तीला पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. सार्वत्रिक निवडणुकीच्या दरम्यान नागरिकांनी पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या. तसेच मुबलक, अनियमित पाणीपुरवठ्याची बाब अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले होती; पण या तक्रारीची दखल घेत प्रशासनाकडून घेण्यात आली नसल्याने बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार आमदार हितेंद्र ठाकूर, माजी आमदार राजेश पाटील यांच्या नेतृत्वात नगरसेवक अजित भोईर यांनी अमृत योजनेअंतर्गत जानकी पाडा येथे जलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी पाठपुरावा केला होता. अखेर स्थानिक नगरसेवक अजित भोईर, नगरसेविका प्रार्थना मोंडे, तसेच काजल गोपाळे यांच्या उपस्थितीत कामाचा शुभारंभ केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com