आरोग्य अनास्थेविरोधात आंदोलन
सुदृढ आरोग्यासाठी एल्गार
आदिवासी एकता परिषदेचे आज आंदोलन
पालघर, ता. २५ ः जिल्ह्यामधील आरोग्य व्यवस्था कोलमडल्याने ग्रामीण रुग्णांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. गोरगरीब रुग्णांची उपचारांसाठी फरफट होत असल्याने आदिवासी एकता परिषदेमार्फत शुक्रवारी (ता. २७) आंदोलनातून शासनाचे लक्ष वेधले जाणार आहे.
जिल्ह्यातील ट्रामा केअर सेंटर, जिल्हा रुग्णालय, माता व शिशू उपचार केंद्रांचा अभावामुळे भौतिक सुविधा अनेक वर्षांपासून अपूर्णावस्थेत आहेत. ज्या आरोग्य संस्था कार्यरत आहेत, तिथे मनुष्यबळ, उपकरणे आणि इतर सुविधांची कमतरता जाणवत आहे. जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजले असून, जिल्हावासीयांनी जगावे की मरावे, असा प्रश्न आदिवासी एकता परिषदेने प्रशासनाकडे उपस्थित केला आहे. जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्य सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने चहाडे येथून रॅली काढून मनोर ट्रामा केअर सेंटर येथील जव्हार फाट्यावर जाणार आहे.
--------------------------
रॅलीतून निषेध
- पालघर जिल्ह्यातील मोठे मोठे प्रकल्प होत असताना जिल्ह्याच्या निगडीची ही आरोग्य भौतिक सुविधा अजूनही कोलमडली आहे. आरोग्य व्यवस्थेमध्ये आवश्यक मनुष्यबळ, उपकरणे अशा अनेक गोष्टींचा अभाव आहे. त्यामुळे रुग्णांना आरोग्य सुविधा मिळत नाही.
- आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून आदिवासी एकता परिषदेमार्फत चहाडे येथील बिरसा मुंडा स्मारकापासून ते टाकवाहाल येथील ट्रामा केअर सेंटरपर्यंत रॅली काढण्यात येणार असून, आरोग्य अनास्थेविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे.
-------------------------
आंदोलकांचे आक्षेप
ट्रामा केअर सेंटर, जिल्हा रुग्णालय, माता शिशू उपचार केंद्र लवकरात लवकर चालू करावीत. ही आरोग्य केंद्र सुरू करण्याला विलंब केलेले ठेकेदार आणि सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी यासह रखडलेली जलजीवन मिशन योजना तातडीने सुरू करावी, या कामात दिरंगाई करणाऱ्या सर्वांवर गुन्हे दाखल करावे. टोकराळे येथील रिलायन्स टेक्स्टाईल प्रकल्पाला वांद्री बंधाऱ्यातून पाणी देण्यात येऊ नये, जिल्ह्यातील पर्यावरणाचा विनाश करणारे प्रकल्प रद्द करावेत, अशा मागण्या आंदोलनाच्या माध्यमातून केल्या जाणार आहेत.
----------------------------------
आरोग्यासाठी भौतिक सुविधा म्हणून टाकव्हाळ येथील केअर सेंटर महत्त्वपूर्ण आहे, तर जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून जिल्हावासीयांना दर्जेदार सुविधा मिळणार आहेत. मात्र, ही दोन्ही रुग्णालये अजूनही पूर्ण झालेली नाहीत. पाच-सहा वर्षांपासून ही रुग्णालये अर्धवट स्थितीत आहेत. त्यामुळे रुग्णांना योग्य उपचार मिळत नसल्याने परजिल्ह्यांमध्ये उपचारांसाठी जावे लागते, ही शोकांतिका आहे.
- परशुराम चावरा, सदस्य, आदिवासी एकता परिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

