घनकचरा, मलजल व्यवस्थापनाचे धडे
घनकचरा, मलजल व्यवस्थापनाचे धडे
विरार, ता. २६ (बातमीदार) ः वसई-विरार पालिका, युनिट्रॅक मीडिया तसेच वसई तालुका हाउसिंग फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘घनकचऱ्याचे व्यवस्थापन व मलजल व्यवस्थापन आणि पुनर्विकास’ या विषयावर मोफत शिबिर, प्रदर्शन होणार आहे. वसई-विरार पालिकेच्या मुख्य कार्यालय, दुसरा मजला, यशवंतनगर, विरार (पश्चिम) येथे शनिवारी, रविवार सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत हे शिबिर होणार आहे.
शहराच्या स्वच्छतेच्या दृष्टीने प्रदर्शनात आवश्यक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच ‘सांडपाणी प्रक्रिया’ या विषयावर नवीन तांत्रिक उपकरणे, साधने यांचे प्रदर्शन केले जाणार आहे. ओला-सुका कचरा, संगणकीय कचरा असे कचऱ्याचे वर्गीकरण स्वत:च्या घरापासून कसे करावे, प्लॅस्टिकचा वापर कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, घरात दररोज निर्माण होणाऱ्या जैविक कचऱ्याचे खतामध्ये कसे रूपांतर करावे, तसेच ‘स्वच्छतेबाबत नागरिकांची जबाबदारी’बाबत सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

