केडीएमसी नगररचना विभागातील बांधकाम फाईलच गायब
नगररचना विभागातील बांधकाम कागदपत्रे गहाळ
कल्याण-डोंबिवली महापालिकेची पोलिस ठाण्यात तक्रार
कल्याण, ता. २५ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या नगररचना विभागातून वादग्रस्त युसूफ हाइट्स इमारतीची संपूर्ण बांधकामासंदर्भातील कागदपत्रांची फाइल गहाळ झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी महापालिकेने बाजारपेठ पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, तक्रारीनंतर बुधवारी (ता. २५) फॉरेन्सिक विभागाकडून महापालिकेत अधिक तपास करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेतील रेतीबंदर परिसरात विकसक सलमान डोलारे आणि फराज महमूद यांच्यावर सात मजल्यांची परवानगी घेऊन प्रत्यक्षात १० मजल्यांची इमारत उभारल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सध्या आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत असून, नगररचना विभागाकडील चौकशीत इमारतीचे तीन मजले अनधिकृत असल्याचा अहवाल यापूर्वी देण्यात आला होता; मात्र तीन वर्षांत कोणतीही याप्रकरणी कोणतीही कारवाई झाली नाही. वाढीव बांधकामातील वरच्या तीन मजल्यांवरील घरांची विक्री करून आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रारही महापालिकेकडे यापूर्वी करण्यात आली होती; परंतु आता संबंधित इमारतीची संपूर्ण बांधकाम कागदपत्रांची फाइलच हरवल्याचे समोर आले आहे. पोलिस आणि फॉरेन्सिक विभागाकडून नगररचना विभागात या प्रकरणाचा तपास केला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

