कल्याण-डोंबिवलीतील ७ शाळा अनधिकृत
कल्याण-डोंबिवलीतील सात शाळा अनधिकृत
पालिकेकडून यादी जाहीर; फौजदारी कारवाईचा इशारा
डोंबिवली, ता. २६ : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील पालकांसाठी एक महत्त्वाची आणि सावध करणारी बातमी समोर आली आहे. शासनाची कोणतीही अंतिम मान्यता न घेता सुरू असलेल्या सात इंग्रजी माध्यम प्राथमिक शाळांची यादी महापालिकेच्या शिक्षण विभागाने जाहीर केली आहे. या शाळांकडे अधिकृत ‘यू-डायस’ क्रमांक नसल्याने त्या अनधिकृत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
महापालिकेने पालकांना आवाहन केले आहे, की आपल्या पाल्याचा प्रवेश घेण्यापूर्वी शाळेची अधिकृत मान्यता आवर्जून तपासावी. या अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये, अन्यथा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. अधिक माहितीसाठी पालकांनी शिक्षण विभाग, झोजवाला शॉपिंग सेंटर, सहजानंद चौक, कल्याण (प.) येथील कार्यालयाशी संपर्क साधावा.
शाळांमध्ये सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी त्यांचे अन्य मान्यताप्राप्त शाळांमध्ये समायोजन करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. संबंधित शाळांनी शासनाचा दंड न भरल्यास किंवा बेकायदा शाळा सुरूच ठेवल्यास, त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे.
अनधिकृत शाळांची यादी
शाळेचे नाव ठिकाण संस्था/ट्रस्ट
संकल्प इंग्लिश स्कूल बल्याणी, टिटवाळा सरिता एज्युकेशन ट्रस्ट
सनराईज इंग्लिश स्कूल बल्याणी, टिटवाळा -
ईवा वर्ल्ड स्कूल गौरीपाडा, कल्याण (प.) प्रगत शिक्षण संस्था
क्रेस्टमॉड स्कूल योगीधाम, कल्याण (प.) प्रगत शिक्षण संस्था
सिंघानिया स्कूल उंबर्डे गाव, कल्याण (प.) अनुभव ट्रस्ट
सी. पी. गोयंका स्कूल आयरेगाव, डोंबिवली (पू.) -
बुद्धीस्ट इंटरनॅशनल स्कूल महाराष्ट्रनगर, डोंबिवली (प.) -
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

