''रंग बरसे होळी के...''
रंगपंचमीनिमित्त बाजारात नैसर्गिक रंगाला पसंती
हर्बल रंग, स्नो स्प्रे, कॅप्सूल रंगाला जास्त मागणी
ठाणे, ता. २६ (बातमीदार) : होळी, रंगपंचमी उत्सवासाठी ठाणे बाजारपेठेत जय्यत तयारीला सुरुवात झाली आहे. रंगपंचमीला मोठ्या प्रमाणात रंग खेळला जातो. यानिमित्ताने विविध प्रकारचे रंग आणि गुलाल विक्रीसाठी बाजारात दाखल झाले आहेत. बाजारपेठा आणि चौकांमध्ये रंग, गुलालासह पिचकारी, टोप्या आदी वस्तूंची दुकाने थाटली आहेत. यामध्ये नैसर्गिक रंगांना ग्राहकांकडून मोठी पसंती मिळत असल्याचे व्यापारी सांगत आहेत.
होळी, रंगपंचमी या सणाला सामाजिक महत्त्व आहे. या दिवशी लोक आपसातील मतभेद विसरून एकत्र येतात. एकमेकांना रंग लावून हा उत्सव साजरा केला जातो. लाल रंग प्रेमाचे प्रतीक आहे. त्यामुळे हा रंग लावल्यास वाद मिटतात आणि प्रेम वाढते, अशी भावना आहे. यानिमित्त विविध प्रकारचे रंग आणि गुलाल विक्रीसाठी बाजारात दाखल झाले आहेत. बच्चेकंपनीसह तरुणही मोठ्या प्रमाणात रंगखरेदी करत आहेत. एकूणच होळी आणि रंगपंचमीचा उत्साह बाजारात फुललेला दिसत आहे. पिचकारी, नैसर्गिक रंग, गुलाल आदी वस्तूंची मागणी खूप वाढली असून महागाईच्या झळा यंदाच्या होळी व रंगपंचमीला लागला नाही. यामुळे आता होळीच्या सणासाठी नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे, असे व्यापारी धीरज यांनी सांगितले.
नैसर्गिक रंगाला मागणी
रंगपंचमीसाठी विविध रंग, गुलालाला मागणी असली तरी जनजागृतीमुळे नागरिक आता नैसर्गिक रंग आणि हर्बल गुलालाची मागणी करत आहेत. नैसर्गिक रंग, हर्बल गुलाल, सुगंधित गुलाल, गुलाल स्प्रे, नॅचरल पेंटची बाजारात १५० ते १,२०० रुपयांपर्यंतच्या कॅनमध्ये उपलब्ध आहे. या वेळी बाजारात मेड इन इंडिया वस्तूंचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे.
रंगाची किंमत
रंग - १० ते ६० (अर्धा किलो)
स्नो स्प्रे - ६० (छोटा), १०० (मोठा)
सिंगिंग बर्ड वॉटर रंग - ३० (१), ५० (२)
मुलांसाठी वॉटर स्प्रे - ४०
हर्बल रंग - १२० (१)
कांगारू वॉटर रंग - १००
गुलाल शॉट - २२०
कॅप्सूल रंग - ५ (१), १०० बॉक्स (४० ते ५० गोळ्या)
फेस आर्ट रंग - २० (चार ते पाच रंग - ब्लॅक, सिल्व्हर, गोल्डन, ग्रीन, पिंक)
पॉलिथिन बॅग - ३० (१), १०० (४)
फुगे - ३० (१), ५० (२)
बेबी बलून पॅक (११ पीस) - १००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

