ठाण्यात खून व खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत घट; मात्र उकल टक्केवारीत घसरण

ठाण्यात खून व खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत घट; मात्र उकल टक्केवारीत घसरण

Published on

गंभीर गुन्ह्यांच्या संख्येत घट
ठाण्यात खून व खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत घट; मात्र उकल टक्केवारीत घसरण
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २६ : ठाणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये खून आणि खुनाचा प्रयत्न यांसारख्या गंभीर गुन्ह्यांच्या संख्येत घट झाल्याचे समाधानकारक चित्र समोर आले आहे. पोलिसांच्या प्रतिबंधात्मक कारवायांमुळे गुन्हेगारीवर वचक बसला असला तरी, गुन्ह्यांच्या उकलीच्या टक्केवारीत मात्र किंचित घसरण झाली आहे. मागील वर्षी शंभर टक्के असणारा उकल दर यंदा ९७ ते ९९ टक्क्यांवर येऊन थांबला आहे.
पोलिसांच्या अधिकृत आकडेवारीनुसार, २०२५ मध्ये खून आणि खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांची संख्या कमी झाली असली तरी उघडकीस आलेल्या गुन्ह्यांचे प्रमाण २०२४ इतके समाधानकारक राहिलेले नाही. विशेष म्हणजे, पूर्वी जवळपास शंभर टक्के उकल होणाऱ्या गुन्ह्यांच्या तुलनेत २०२५ मध्ये ९७ टक्के इतका नोंदविण्यात आला असून, खुनाचा प्रयत्न या प्रकारातील गुन्ह्यांमध्ये उकल दर ९९ टक्के इतका आहे. आकडेवारीनुसार हे प्रमाण उच्च मानले जात असले तरी मागील वर्षाच्या तुलनेत शंभर टक्के उकल साध्य करण्यात पोलिसांना यश आलेले नाही.
गुन्ह्यांची संख्या घटल्यामुळे या प्रकरणांतील आरोपींची संख्याही कमी झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, पोलिसांकडून गुन्हे उघडकीस आणण्यासाठी विशेष पथके, सीसीटीव्ही विश्लेषण, तांत्रिक पुरावे आणि माहितीदारांचे जाळे अधिक मजबूत करण्यावर भर दिला जात असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. आगामी काळात गंभीर गुन्ह्यांची उकल शंभर टक्क्यांच्या जवळ नेण्याचे आव्हान पोलिसांसमोर असल्याचेही सांगितले जात आहे.

खुनाच्या गुन्ह्यांचा तक्ता
वर्ष दाखल/ उघड /आरोपी/टक्केवारी
२०२५ ७३/ ७१/ ११३/ ९७%
२०२४ ८५/ ८५/ १७०/ १००%

खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांचा तक्ता
वर्ष दाखल/ उघड/आरोपी/टक्केवारी
२०२५ १६१/ १६०/ ३७२/ ९९%
२०२४ १६८/ १६८/ ४२३/ १००%

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com