कोपर स्टेशनवर चविष्ट नाष्ट्याचे पदार्थ

कोपर स्टेशनवर चविष्ट नाष्ट्याचे पदार्थ

Published on

कोपर स्थानकावर आता घरगुती जेवणाची मेजवानी
महिला बचत गटाच्या ‘खाद्य स्टॉल’चे उद्घाटन

डोंबिवली, ता. २६ : कोपर रेल्वे स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता घरगुती, ताजे आणि चविष्ट पदार्थ चाखायला मिळणार आहेत. मच्छिंद्रनाथाय महिला बचत गटातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण आणि माजी नगरसेविका ज्योती पवन पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून कोपर रेल्वे स्थानक परिसरात खाद्य स्टॉल उपलब्ध करून देण्यात आला आहे. स्टॉलच्या माध्यमातून महिलांनी घरगुती पद्धतीने तयार केलेले ताजे नाष्ट्याचे पदार्थ आणि जेवण विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहे. यामुळे प्रवाशांना खात्रीशीर आणि स्वच्छ अन्न मिळणार असून, बचत गटातील महिलांना हक्काचा रोजगार उपलब्ध झाला आहे.

नगरसेविका ज्योती पाटील यांनी या उपक्रमासाठी रेल्वे प्रशासनाकडून रीतसर परवानगी मिळवली आहे. याकामी कोपर रेल्वे स्थानक मास्तर यांनीही विशेष सहकार्य करून महिलांना प्रोत्साहन दिले आहे. महिलांचा आत्मविश्वास वाढावा आणि त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. महिलांना रोजगाराची संधी देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे, ही काळाची गरज आहे. त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी आम्ही सातत्याने असे विविध उपक्रम राबवत आहोत, अशी प्रतिक्रिया ज्योती पाटील यांनी या वेळी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com