ठाणे रेल्वे स्थानकात मोबाईल चोरटा रंगेहाथ पकडला;

ठाणे रेल्वे स्थानकात मोबाईल चोरटा रंगेहाथ पकडला;

Published on

ठाणे रेल्वे स्थानकात मोबाईल चोरटा रंगेहाथ पकडला
सहप्रवासी व पोलिसांच्या सतर्कतेने गुन्हा उघड
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २६ : लोकलमधील प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत, मोबाईल चोरी करणाऱ्या कळव्यातील मनुव्वर अकुमुल्ला शेख (वय ४५) या चोरट्याला सहप्रवासी आणि साध्या वेशातील पोलिसांच्या मदतीने रंगेहाथ पकडण्यात ठाणे रेल्वे पोलिसांना यश आले. ही घटना मंगळवारी (ता. २५) ठाणे रेल्वे स्थानकात घडली.
मुलुंड येथील तक्रारदार सौरभ पन्हाळकर (वय २४) हे घणसोली येथील कंपनीतून घरी परतत होते. मंगळवारी सायंकाळी ठाणे रेल्वे स्थानकात गर्दीतून उतरत असताना त्यांच्या पॅन्टच्या उजव्या खिशात ठेवलेला मोबाईल कोणीतरी काढल्याचे त्यांच्या लक्षात आले. वेळीच त्यांनी चोर-चोर आरडाओरडा केल्याने सहप्रवासी हर्षील जैन आणि साध्या वेशातील पोलिसांनी संशयित व्यक्तीचा पाठलाग करून त्याला पकडले. त्याच्या अंगझडतीत तक्रारदार यांचा सुमारे ४० हजार किंमतीचा मोबाईल मिळून आला. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com