संदेश विद्यालयाकडून बालभवन गौरव गीताचे सादरीकरण
संदेश विद्यालयाकडून बालभवन गौरव गीताचे सादरीकरण
घाटकोपर, ता. २६ (बातमीदार) : महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवनचा ७४वा वर्धापनदिन मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात उत्साहात साजरा झाला. विविध स्पर्धांतील विजेत्यांचा या वेळी गौरव करण्यात आला.
ज्ञानप्रसारक शिक्षण संस्थेच्या संदेश विद्यालय व सनराईज इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी संगीत शिक्षक मनोहर म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली बालभवन गौरव गीत सादर केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या वेळी प्रधान सचिव रणजितसिंग देओल, विभागीय उपसंचालक राजेश कंकाळ, प्रशांत भामरे व संचालक नीता पाटील उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

