बेलदार यांची बदलीनंतर जनजागृती मोहीम

बेलदार यांची बदलीनंतर जनजागृती मोहीम

Published on

बेलदार यांची बदलीनंतर जनजागृती मोहीम
नांदवी आदिवासीवाडीत जाऊन गोरेगाव पोलिसांची शिक्षणाविषयी जनजागृती
श्रीवर्धन, ता. २६ (बातमीदार) : माणगाव पोलिस ठाण्यातून गोरेगाव पोलिस ठाण्यात बदली झाल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र बेलदार यांनी कार्यभार स्वीकारताच समाजाभिमुख उपक्रम हाती घेतला. गोरेगाव पोलिस ठाण्याच्या वतीने शनिवारी (ता. २१) सायंकाळी ७ ते ९ या वेळेत अतिदुर्गम नांदवी येथील वरची वाडी या आदिवासी वस्तीत दामिनी पथकाने भेट देत व्यापक जनजागृती केली.
या मोहिमेत दामिनी पथकातील पोलिस कर्मचारी रेखा मोहिते व घाग यांनी वस्तीत प्रत्यक्ष भेट देऊन शालेय विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण केली. या वेळी पोलिस शिपाई बाळकृष्ण पाटील हेदेखील उपस्थित होते. नियमित शाळेत उपस्थित राहण्याचे महत्त्व आणि शिक्षणामुळे होणारे वैयक्तिक व सामाजिक फायदे याबाबत मुलांना मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी ग्रामस्थांशी संवाद साधत व्यसनमुक्ती, बालविवाह प्रतिबंध, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध व शिक्षणाचे महत्त्व या विषयांवर माहिती दिली. दारू, तंबाखू आदी व्यसनांचे आरोग्य व कुटुंबावर होणारे दुष्परिणाम स्पष्ट करण्यात आले, तर बालविवाह हा कायद्याने गुन्हा असल्याचे सांगून त्याचे सामाजिक व मानसिक परिणाम समजावून देण्यात आले. महिलांचे कायदेशीर अधिकार तसेच घरगुती हिंसाचाराच्या घटनांबाबत तक्रार करण्याच्या प्रक्रियेचीही माहिती देण्यात आली. कार्यक्रमास ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत पोलिस विभागाच्या मार्गदर्शनाचे पालन करण्याचे आश्वासन दिले.

सोबत
छायाचित्र :

श्रीवर्धन ः आदिवासीवाडीवरील कार्यक्रमात प्रभारी बेलदार व कर्मचारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com