मॅनहोलवरील लोखंडी झाकण गायब; दुर्घटनेची भीती
मॅनहोलवरील लोखंडी झाकण गायब; दुर्घटनेची भीती
चेंबूर, ता. २६ (बातमीदार) : गोवंडी येथील देवनार पालिका वसाहत, इमारत क्रमांक १७ जवळील रस्त्यावर असलेल्या मॅनहोलवरील लोखंडी झाकण चोरीला गेल्याने परिसरात धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. उघड्या मॅनहोलमुळे रहिवाशांना या मार्गावरून ये-जा करताना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे.
मुंबईत गेल्या काही महिन्यांपासून मॅनहोलची शेकडो झाकणे चोरीला गेल्याच्या घटना घडल्या असून, त्यातून अपघात होऊन सामान्य नागरिकांचे बळीही गेले आहेत. अशाच प्रकारची परिस्थिती देवनार पालिका वसाहतीत निर्माण झाली आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित मॅनहोलवरील झाकण अनेक दिवसांपासून गायब आहे. त्यामुळे एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत पालिका प्रशासनाला कळविण्यात आले असूनही अद्याप झाकण बसविण्यात आलेले नाही. परिणामी वाहनचालक आणि पादचारी दोघांनाही मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
उघड्या मॅनहोलवर तातडीने नवीन झाकण बसवून नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

