पनवेल, कामोठ्यात सोनसाखळी चोरट्यांचा धुमाकूळ
पनवेल, ता. २६ (वार्ताहर) : सोनसाखळी चोरणा करणाऱ्या मोटारसायकलस्वार लुटारुंनी पनवेल आणि कामोठे परिसरात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. या लुटारुंनी अवघ्या दोन दिवसांत तीन महिलांच्या अंगावरील तब्बल ११ लाख २० हजारांहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने व मंगळसूत्रे हिसकावून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. सकाळी फेरफटका, सायंकाळी खरेदीसाठी तसेच रात्री फिरायला बाहेर पडलेल्या, महिलांचे दागिने लुटल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
छाया नामदेव महाडकर (वय ५५) या पतीसह मंगळवारी (ता. २४) सकाळी करंजाडे सेक्टर-३ येथील सदाबहार नर्सरीजवळ फेरफटका मारत असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांना पत्ता विचारण्याचा बहाणा केला. त्यानंतर लुटारुंनी छाया यांच्या गळ्यातील २० ग्रॅमचे मंगळसूत्र खेचून पलायन केले. झटापटीत त्यांना दुखापत झाली असून, पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बुधवार (ता. २५) सायंकाळी पनवेल शहरातील गोविंद हॉटेलसमोर लता गणेश गोडेकर (वय ४७) या चालत जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे सात तोळे वजनाचे मंगळसूत्र खेचून नेले. त्याच दिवशी रात्री कामोठे येथे सुधा राजन गुप्ता (वय ५५) या पतीसमवेत रिक्षाने खारघरकडे जात असताना मॅकडोनाल्ड्ससमोर मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी रिक्षा शेजारी येत सुधा यांच्या गळ्यातील ३० ग्रॅमचे मंगळसूत्र हिसकावून नेले. या घटनेतील लुटारुंविरोधात कामोठे पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
एकाच टोळीचा संशय?
या तिन्ही घटनांमध्ये लुटारुंची समान पद्धत आढळून आली आहे. त्यामुळे या घटना एकाच टोळीने केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून लुटारुंचा माग काढण्याचे काम वेगाने सुरू केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

