नवी मुंबईत जड वाहनांना दोन दिवस बंदी
नवी मुंबई, ता. २६ (वार्ताहर) : हिंद-दी-चादर गुरु तेग बहादुर यांच्या शहिदी समागमनिमित्त खारघर येथे दोनदिवसीय कार्यक्रमावेळी लाखोंच्या संख्येने भाविक आणि अनेक महत्त्वाच्या व्यक्ती येणार आहेत. त्यामुळे खारघर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने दोन दिवस शहरातील सर्व मार्गांवर जड-अवजड मालवाहतूक वाहनांना सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.
हिंद-दी-चादर या दोनदिवसीय समागमाच्या कार्यक्रमाला सुमारे १५ लाखांपेक्षा अधिक भाविक आणि नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री, मंत्री व अनेक महत्त्वाच्या व्यक्ती येणार आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने खारघर परिसरामध्ये मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या समागमाच्या निमित्ताने नवी मुंबईत दाखल होणाऱ्या भाविकांची कोणत्याही प्रकारची असुविधा होऊ नये, तसेच खारघर व आजूबाजूच्या परिसरामध्ये होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी, तसेच पार्किंगचे योग्य नियोजन करण्यासाठी नवी मुंबई वाहतूक विभागाने २८ फेब्रुवारी आणि १ मार्चला जड-अवजड मालवाहतूक वाहनांना सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत बंदी घातली आहे, असे पोलिस उपआयुक्त (वाहतूक) तिरुपती काकडे यांनी अधिसूचना जारी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

