जलकुंभ उभारणीसाठी निविदा प्रसिद्ध करण्याची मागणी

जलकुंभ उभारणीसाठी निविदा प्रसिद्ध करण्याची मागणी

Published on

नेरूळ, ता. २६ (बातमीदार) : कोपरखैरणे सेक्टर २३ येथील जलकुंभ बांधकामासाठी निविदा प्रसिद्ध करून काम तत्काळ सुरु करण्याची मागणी शिवसेनेचे युवा नेते सुनिकेत हांडेपाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे निवेदनातून केली आहे. या परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता नियमित व पुरेसा पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे. सध्या उपलब्ध पाणीसाठा अपुरा पडत असल्याने नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्या अनुषंगाने २०२१ पासून महापालिकेकडे माझा पाठपुरावा चालू होता. नवी मुंबई महापालिका निवडणूक आचारसंहितेच्या एक दिवस अगोदर नवीन जलकुंभ बांधण्यासाठी प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली. आचारसंहितेमुळे निविदा प्रसिद्ध करता आली नाही. आता निवडणुका झाल्या आहेत. जलकुंभ बांधकामासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात यावी व निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामास तत्काळ सुरुवात करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com