उन्हाळ्यात रात्री उशिरापर्यंत उद्यान सुरू ठेवण्याची मागणी

उन्हाळ्यात रात्री उशिरापर्यंत उद्यान सुरू ठेवण्याची मागणी

Published on

नेरूळ, ता. २६ (बातमीदार) : नेरूळ सेक्टर आठमधील राजर्षी छत्रपती शाहू महाराज उद्यान उन्हाळा कालावधीत गतवर्षीप्रमाणे याही वर्षी रात्री ११ वाजेपर्यंत चालू ठेवण्याची मागणी युवा सेनेचे नवी मुंबई जिल्हा सरचिटणीस निखिल मांडवे यांनी महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

सध्या उन्हाळा सुरू झालेला आहे. नवी मुंबईतील जनतेला घरामध्ये उकाडा सहन करावा लागत असल्याने ते अधिकाधिक वेळ परिसरात सार्वजनिक उद्यानामध्ये मोकळ्या हवेमध्ये घालवत असतात. नेरूळ सेक्टर आठमध्ये महापालिकेचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज उद्यान गेल्यावर्षी रात्रीच्या वेळी एक तास अधिक कालावधी सुरू ठेवण्यात आले होते. त्यामुळे यंदाही स्थानिक रहिवाशांना घरातील उकाड्यापासून दिलासा देण्यासाठी रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात यावे. घरामध्ये उन्हामुळे उकाडा सहन करावा लागत असल्याने सेक्टर आठमधील रहिवासी अधिकाधिक वेळ उद्यानात बसलेले असतात. त्यामुळे यंदाही उन्हाळा कालावधीत उद्यान रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मागणी निखिल मांडवे यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com