नवी मुंबई शहरात रक्ताचा तुटवडा

नवी मुंबई शहरात रक्ताचा तुटवडा

Published on

बेलापूर, ता. २८ (बातमीदार) : दरवर्षीप्रमाणे नवी मुंबई शहरात हिवाळ्यानंतर रक्ताची मोठी चणचण भासत आहे. पॅलसेमिया, कर्करोग आणि अन्य आजारातील रुग्णांना रक्ताचा सुलभ पुरवठा होण्यासाठी अडचण येत आहे. अपघात, बाळंतपण अशा तातडीच्या आवश्यकतेसाठीही रक्त उपलब्ध करणे अवघड झाले आहे. अन्यथा रुग्णांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

फेब्रुवारीच्या मध्यापासून नवी मुंबई शहरात उष्णतेची तीव्रता वाढली आहे. शहरातील तापमान २९ अंश सेल्सिअसपर्यंत गेल्याने उन्हाची दाहकता अधिक तीव्रतेने जाणवू लागली आहे. अशातच शहरात गेल्या काही दिवसांपासून रक्ताचा तुटवडा जाणवू लागला असून उष्णता वाढत असताना तुटवड्यात अधिक वाढ झाली आहे. परिणामी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यासाठी रक्तपेढ्यांना शोधाशोध करावी लागत आहे. काही रक्तपेढ्यांमध्ये पाच दिवस, तर काही ठिकाणी एका आठवड्याचा रक्तसाठा शिल्लक आहे. त्यामुळे रक्तदान शिबिर आयोजित करण्याचे आवाहन रक्तपेढ्यांतर्फे करण्यात येत आहे.

सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. उष्णतेतदेखील वाढ झाली आहे. स्वतःचे आरोग्य जपण्याला नागरिक अधिक प्राधान्य देत असल्याने रक्तदानासाठी नागरिक तयार होत नाहीत. सद्यस्थितीत रक्ताचा तुटवडा असून रक्तदात्यांची गरज आहे, असे केमिस्ट ब्लड बँकेचे व्यवस्थापक मधुकर गावडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com