माणगाव सेल्स प्रीमियर लीग २०२६चा किताब ‘आपला बाजार माणगाव’कडे

माणगाव सेल्स प्रीमियर लीग २०२६चा किताब ‘आपला बाजार माणगाव’कडे

Published on

माणगाव सेल्स प्रीमियर लीग २०२६चा किताब ‘आपला बाजार माणगाव’कडे
धनसे ग्राउंडवर रंगल्या मार्केटिंग क्षेत्रातील आठ संघांच्या रोमांचक लढती
माणगाव, ता. २६ (वार्ताहर) : माणगाव सेल्स प्रीमियर लीग आयोजित क्रिकेट स्पर्धा धनसे ग्राउंड येथे उत्साहात पार पडल्या. वर्षभराच्या धावपळीतून एक दिवस तरी मार्केटिंग क्षेत्रातील युवकांनी खेळाचा आनंद घ्यावा या उद्देशाने गेल्या पाच वर्षांपासून या स्पर्धेचे सातत्याने आयोजन केले जाते. यंदाच्या स्पर्धेत आठ संघांनी सहभाग घेतला होता. अंतिम सामन्यात विक्रम सर यांच्या नेतृत्वाखालील ‘आपला बाजार माणगाव’ संघाने शानदार विजय मिळवत विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेसाठी माणगाव, महाड, श्रीवर्धन, नागोठणे व खेड येथील डिस्ट्रीब्युटर आणि व्यापारी वर्गाचे मोलाचे सहकार्य लाभले. स्पर्धेचे नियोजन कार्याध्यक्ष सुनील म्हशेळकर, शैलेश बामणे, अध्यक्ष विजय भादावकर, निलेश शिंदे, उपाध्यक्ष सचिन लोणारकर, खजिनदार सुरज भोनकर, सहखजिनदार अखिल बक्कम, सचिव तुषार म्हसकर, सहसचिव ऋतिक तळेकर तसेच सल्लागार मंडळाने केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com