मुलाला बंदुकीचा धाक
खारघरमध्ये मुलाला बंदुकीचा धाक; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
खारघर, ता. २६ (बातमीदार) : खारघरमध्ये हिंद-दी-चादर कार्यक्रमाची तयारी सुरू असताना, सेक्टर १८ परिसरात बुधवारी (ता. २५) दुपारी ३.३०च्या सुमारास एक गंभीर आणि धक्कादायक घटना घडली. शिकवणीसाठी जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला मुख्य रस्त्यावरील सेलिब्रेशन गेटजवळ अज्ञात व्यक्तींनी बंदुकीचा धाक दाखवून अज्ञातांकडून धमकावल्याचे समोर आले आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी खारघरमधील सांचू मेनन यांनी सोशल मीडियाद्वारे मुख्यमंत्री आणि पोलिसांकडे करताच नवी मुंबई पोलिसांनी या घटनेची दाखल घेतली आहे. दरम्यान, या घटनेमुळे खारघर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पालक आणि नागरिकांमध्ये मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.
नवी मुंबई पोलिस केवळ रस्त्यावरील वाहनचालकाकडून दंड वसूल करण्यात मग्न आहेत. अज्ञात व्यक्ती दिवसाढवळ्या बंदुकीचा धाक दाखवतात, ही गंभीर घटना आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पडताळणी करून आरोपीचा शोध घेऊन अटक करावी.
- सांचू मेणन, रहिवासी खारघर
सोशल मीडियावर तक्रार केल्याचे समजले; मात्र या घटनेसंदर्भात कोणीही पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केलेली नाही; मात्र खारघर पोलिस दक्ष आहेत. अशा प्रकारची घटना असेल तर नागरिकांनी तत्काळ पोलिस ठाण्यात तक्रार करावी.
- संजय जोशी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, खारघर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

