एकलव्य स्कूलसाठी रविवारी प्रवेशपूर्व परीक्षा
शहापूर, ता. २६ (वार्ताहर) : राज्यातील एकलव्य मॉडेल निवासी शाळांअंतर्गत कार्यरत ३७ निवासी शाळांमधील तीन हजार ९३ रिक्त जागांसाठी येत्या रविवारी (ता. १) प्रवेशपूर्व परीक्षा आहे. ठाणे व पालघर जिल्ह्यांतून एकूण एक हजार ७२८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली असून या दोन्ही जिल्ह्यांत मिळून १० परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही परीक्षा महत्त्वाची मानली जात आहे. परीक्षेची प्रक्रिया सुरळीत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. ठाणे, पालघर जिल्ह्यांतील सर्व केंद्रांवर पिण्याच्या पाण्याची सुविधा, बैठक व्यवस्था; तसेच प्रथमोपचाराची सोय उपलब्ध करून दिली आहे. सहावीच्या प्रवेशासाठी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत परीक्षा होणार आहे. तर सातवी ते नववीसाठी सकाळी ११ ते दुपारी २ अशी वेळ निश्चित केली आहे. सहावीच्या दोन हजार २२० जागांसाठी लेखी परीक्षा घेतली जाणार असून, सातवी ते नववीच्या ८७३ रिक्त जागांवर गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेशपूर्व परीक्षेकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागले असून, गुणवत्तेच्या आधारे निवड होणार असल्याने स्पर्धा चुरशीची ठरणार आहे.
अर्जांची आकडेवारी
राज्यातील विविध विभागांमधील अर्जांची आकडेवारीही लक्षणीय आहे. नाशिक अप्पर आयुक्त कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातून सर्वाधिक सात हजार ३५३ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्याखालोखाल नागपूर विभागातून तीन हजार ८८७, अमरावती विभागातून तीन हजार ७४, तर ठाणे विभागातून एक हजार ७२८ अर्जांची नोंद झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

