ओढांगी येथे दत्तात्रेय बुवा पाटील प्रवेशद्वाराचे भूमिपूजन

ओढांगी येथे दत्तात्रेय बुवा पाटील प्रवेशद्वाराचे भूमिपूजन

Published on

ओढांगी येथे दत्तात्रेय बुवा पाटील प्रवेशद्वाराचे भूमिपूजन
शिष्यवर्गाच्या पुढाकारातून उभारणार स्मृतीचिन्ह; वारकरी संप्रदायातील भाविकांची उपस्थिती
पेण, ता. २६ (वार्ताहर) : पेण तालुक्यातील ओढांगी येथे भजनसम्राट दत्तात्रेय बुवा पाटील यांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या प्रवेशद्वाराचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले. गेल्या काही वर्षांपासून ओढांगी व परिसरात भजन-कीर्तनाची परंपरा मोठ्या प्रमाणात वाढली असून वारकरी संप्रदायातील भाविकांची येथे सतत वर्दळ असते. भजनसम्राट दत्तात्रेय बुवा पाटील यांनी आपल्या सांप्रदायाच्या माध्यमातून अनेक शिष्य घडविले असून त्यांच्या कार्याच्या स्मरणार्थ हे प्रवेशद्वार उभारण्याचा निर्णय शिष्यवर्गाने घेतला आहे.
भूमिपूजन कार्यक्रमास वाशी ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य, खारभूमी विभागाचे निवृत्त अधिकारी अर्जुन कोळी तसेच वाशी-ओढांगी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रवेशद्वारासाठी लागणारा सर्व खर्च शिष्यगणांकडून करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com