ठाणे–बेलापूर मार्गावर मनपाच्या कचरा गाडीचा नियमभंग
ठाणे–बेलापूर मार्गावर मनपाच्या कचरा गाडीचा नियमभंग
तुर्भेत उलट्या दिशेने धावल्याने अपघाताचा धोका; नागरिकांत संताप
तुर्भे, ता. २६ (बातमीदार) : ठाणे–बेलापूर मार्गावर नवी मुंबई महानगरपालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या गाडीने वाहतूक नियमांचे उघड उल्लंघन केल्याची घटना तुर्भे येथे घडली. बीएसएफ कंपनीसमोर (वाहन क्र. एमएच-४३-सीके-६४४०) ही गाडी उलट्या दिशेने धावत असल्याचे नागरिकांनी पाहिल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या मार्गावर नेहमीच मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. अशा गर्दीच्या रस्त्यावर जड वाहन चुकीच्या दिशेने आल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. प्रत्यक्षदर्शींनी चालकाला जाब विचारला असता त्याने बेफिकीरपणे उत्तर दिल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
वाहतूक शिस्तीसाठी मोहीमा राबविणाऱ्या प्रशासनाच्या वाहनांकडूनच नियमभंग होत असल्याने वाहतूक सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित चालक, ठेकेदार व पर्यवेक्षकांवर कारवाई होणार का, तसेच मनपा व वाहतूक पोलिस याची दखल घेणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
चौकट
कठोर कारवाईची मागणी
सर्वसामान्य नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात असताना मनपाच्या वाहनांकडूनच नियमांचे उल्लंघन होत असल्याची ही गंभीर बाब आहे. जड कचरा वाहतूक करणारी वाहने उलट्या दिशेने धावल्यास जीवितहानीचा धोका वाढतो. त्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाई करून भविष्यात अशा प्रकारांना आळा घालावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

