मोकळ्या भूखंडांवर नागरी सुविधा द्या

मोकळ्या भूखंडांवर नागरी सुविधा द्या

Published on

मोकळ्या भूखंडांवर नागरी सुविधा द्या
नगरसेवक गणेश सकपाळ यांची सिडकोकडे मागणी
नेरूळ, ता. २६ (बातमीदार) : घणसोली रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील मोकळ्या भूखंडांवर आजपर्यंत नागरिकांना अपेक्षित असलेल्या कोणत्याही नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. परिणामी या भूखंडांची दुरवस्था झाली असून प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक सुविधा उभाराव्यात, अशी मागणी भाजपाचे नगरसेवक गणेश सकपाळ यांनी सिडकोकडे केली आहे.
महानगरपालिकेकडून गेल्या दहा वर्षांपासून स्वच्छता अभियान राबविले जात असताना या परिसराचा विसर पडला आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. स्थानक परिसरातील मोकळ्या भूखंडांवर पावसाळी गवत मोठ्या प्रमाणात वाढले असून भरदिवसा साप फिरताना दिसत आहेत. तसेच काही ठिकाणी गर्दुल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. भूखंडांवरील अंतर्गत रस्त्यांचीही मोठी दुर्दशा झाली आहे. या सर्व प्रकारांमुळे प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली.
महत्त्वाच्या नागरी सुविधा दुर्लक्षित करून केवळ आर्थिक स्रोतांकडेच सिडकोचे लक्ष आहे का, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
चौकट
वाहनतळाची तीव्र गरज
घणसोली रेल्वे स्थानक हे महत्त्वाचे स्थानक असून सध्याचा वाहनतळ अपुरा पडत आहे. घणसोली नोड तसेच गावातील हजारो नागरिक कामानिमित्त स्थानकाजवळ वाहने उभी करतात. वाढती वाहनसंख्या लक्षात घेऊन मोकळ्या भूखंडांवर प्रशस्त वाहनतळ उभारण्याचा दूरदृष्टीने निर्णय घ्यावा, अशी मागणी सकपाळ यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com