नेरूळमध्ये वाचनालय व अभ्यासिका सुरू करण्याची मागणी

नेरूळमध्ये वाचनालय व अभ्यासिका सुरू करण्याची मागणी

Published on

नेरूळमध्ये वाचनालय व अभ्यासिका सुरू करण्याची मागणी
नगरसेवक अभिजीत देसाई यांचे आयुक्तांना निवेदन
नेरूळ, ता. २६ (बातमीदार) : नेरूळ परिसरातील विद्यार्थी व नागरिकांसाठी सुसज्ज वाचनालय तसेच अभ्यासिका सुरू कराव्यात, अशी मागणी नगरसेवक अभिजीत देसाई यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी शांत व योग्य जागेची कमतरता भासत असल्याने ही सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली आहे.
प्रभागातील अनेक विद्यार्थी लहान घरांमध्ये वास्तव्यास असल्यामुळे त्यांना अभ्यासासाठी पोषक वातावरण मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होत असल्याची बाब निवेदनात नमूद करण्यात आली आहे. ही अडचण लक्षात घेऊन काही ठिकाणी अभ्यासिका व वाचनालय सुरू करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.
जुईनगर सेक्टर २३ येथील गणेश मैदान परिसरात विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अभ्यासिका सुरू करावी. तसेच सानपाडा सेक्टर ११ मधील सावित्रीबाई फुले सभागृह येथे नागरिकांसाठी वाचनालय व विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेची सोय उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. नेरूळ सेक्टर ४ येथील महापालिका शाळा क्र. १०२ च्या परिसरात मुलांसाठी स्वतंत्र अभ्यासिका उभारण्याचाही प्रस्ताव देण्यात आला आहे. या सुविधा उपलब्ध झाल्यास परिसरातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल तसेच शैक्षणिक दर्जा उंचावण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com