नारंगी-जलसार रो रो सेवा ठरतेय जीवनरेखा
जलसार रो रो सेवा लाभदायक
नऊ महिन्यांत एक लाखांपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक
पालघर, ता. २६ ः अर्नाळा-मारंबळपाडा ते सफाळे जलसार जेट्टीदरम्यान जलसार रो रो सेवा सुरू करण्यात आली होती. ही सेवा ग्रामीण नागरिकांसाठी लाभदायक ठरत असून, एप्रिल २०२५ ते जानेवारी २०२६ या नऊ महिन्यांच्या कालावधीत एक लाखांहून अधिक प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नऊ महिन्यांत एक लाखांहून अधिक प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला असून, हजारो दुचाकी, चारचाकी तसेच लहान मालवाहू वाहनांची वाहतूक या जलमार्गाद्वारे करण्यात आली आहे. रस्तेमार्गाने मोठा वळसा घ्यावा लागत असल्याने वेळ आणि इंधनाचा मोठा अपव्यय होत होता. मात्र, रो-रो सेवेच्या माध्यमातून हा प्रवास अल्पावधीत पूर्ण होऊ लागल्याने नागरिकांचा वेळ वाचत आहे.
स्थानिक नागरिकांकडून या सेवेबाबत समाधान व्यक्त करण्यात येत असून, भविष्यात या सेवेची वेळ, फेऱ्यांची आणि जेट्टींची संख्या वाढवण्याची मागणी करण्यात येत आहे.
सुरक्षित आणि पर्यायी मार्ग
मासेमार, शेतकरी, व्यापारी आणि रोजंदारी कामगारांसाठी ही सेवा जीवनरेखा ठरली आहे. वाहनांसह थेट जलमार्गाने प्रवास करता येत असल्यामुळे मालवाहतुकीस गती मिळाली आहे. शालेय विद्यार्थी, रुग्ण आणि नोकरदारवर्गालाही या सेवेचा मोठा फायदा होत आहे. पावसाळ्यात रस्त्यांची दुरवस्था आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्भवत असताना जलमार्ग सुरक्षित आणि पर्यायी मार्ग म्हणून उपयोगी ठरत आहे. यामुळे ग्रामीण भागातील संपर्क व्यवस्था अधिक सक्षम झाली आहे.
प्रवास वेळेत बचत
खारवाडेश्री (जलसार) ते नारंगी मारंबळपाडा हे रस्त्याचे अंतर ६० किलोमीटरचे असून, सर्वसाधारणपणे या प्रवासासाठी दीड तास लागतो. मात्र, रो रो जलमार्गाने हाच प्रवास १५ ते २० मिनिटांवर आहे. या सेवेमुळे पालघर व वसई तालुक्यातील नागरिकांच्या प्रवास वेळेत मोठी बचत झाली आहे. पालघर हे जिल्ह्याचे मुख्यालय असून, विरार येथून रस्तामार्गे ७० किलोमीटरवर असणारे हे अंतर या जलमार्गामुळे निम्म्यावर आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

