एसी लाेकल फेऱ्यांत पश्चिम रेल्वेवर वाढ
एसी लाेकल फेऱ्यांत
पश्चिम रेल्वेवर वाढ
कार्यालयीन दिवसांत १३३; सुट्टीच्या दिवशी १०६ सेवा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : शहरात उन्हाळ्याची चाहूल लागण्यास सुरुवात होताच उपनगरी रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा वातानुकूलित (एसी) लोकलकडे कल वाढू लागला आहे. वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने एसी लोकलच्या फेऱ्यांत वाढ केली आहे. सध्या सोमवार ते शुक्रवार या कार्यालयीन दिवसांत १३३ तर शनिवार व रविवारी १०६ एसी लोकल फेऱ्या चालविल्या जात असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
कार्यालयीन दिवसांत १२१ एसी लोकल फेऱ्या चालत होत्या. फेब्रुवारीत १२ अतिरिक्त फेऱ्या वाढविण्यात आल्याने कार्यालयीन दिवसांतील एकूण फेऱ्या १२१ वरून १३३ झाल्या आहेत. तसेच सुट्टीच्या दिवशी पूर्वी ७७ एसी लोकल फेऱ्या चालत होत्या. त्यात २९ फेऱ्यांची वाढ करण्यात आल्याने आता वीकेंडला एकूण १०६ एसी लोकल फेऱ्या चालवल्या जात आहेत.
-----
कार्यालयीन वेळेत एसी लोकलच्या फेऱ्यांत वाढ केल्यामुळे प्रवाशांना अधिक आरामदायी आणि सोयीस्कर प्रवास करता येत आहे. सुट्टीच्या दिवशी अतिरिक्त एसी सेवा उपलब्ध केल्याने पर्यटन किंवा वैयक्तिक कारणांसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही त्याचा फायदा होत आहे.
- विनीत अभिषेक, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

