सुरक्षेच्या कारणास्तव विमानतळनजिक नमाज पठणास परवानगी नाही

सुरक्षेच्या कारणास्तव विमानतळनजिक नमाज पठणास परवानगी नाही

Published on

विमानतळानजीक नमाज पठणास परवानगी नाही
सुरक्षेचे कारण; राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या स्थानिक विमान टर्मिनल परिसरात सुरक्षेच्या कारणास्तव, पवित्र रमजान महिन्यात तात्पुरत्या शेडमध्ये नमाज पठणास परवानगी देता येणार नाही, अशी माहिती राज्य सरकारने गुरुवारी (ता. २६) उच्च न्यायालयात दिली.
रमजान या पवित्र महिन्यात नमाज पठण करण्यासाठी मानवतावादी दृष्टिकोनातून चालक आणि प्रवाशांना किमान एक जागा उपलब्ध करण्याचा विचार करा, असे आदेश न्या. बर्गिस कुलाबावाला आणि न्या. फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठाने सरकार आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) दिले होते. तेव्हा स्थानिक विमान टर्मिनलहून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना प्रवेश देण्यात येतो. त्या ठिकाणी रमजान महिन्यापुरती तात्पुरती शेड नमाज पठणासाठी उपलब्ध करणे धोक्याचे ठरू शकते. याशिवाय, सुरक्षा व्यवस्थापनाचे अन्य प्रश्नही उद्भवू शकतात. त्यामुळे संबंधित ठिकाणी नमाज पठण करण्याची मागणी पूर्ण होऊ शकत नाही, असे सरकार आणि एमएमआरडीएतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले. तसेच विमानतळ परिसराच्या अंतरावर तीन वेगवेगळ्या मशिदी असून काही मिनिटांतच तिथे पोहोचता येते, अशी माहिती विमानतळाच्या व्यवस्थापनाकडून देण्यात आली.
त्यावर ही समस्या कायमची सोडवण्यासाठी आणि याचिकाकर्त्यांचे सदस्य नमाज पठण करतील, असे इतर कोणतेही क्षेत्र उपलब्ध होईल का, असे आदेश न्यायालयाने सरकार आणि एमएमआरडीएला दिले. फक्त रमजानदरम्यान त्यांना नमाज पठणासाठी परवानगी दिली जाईल आणि रमजाननंतर, तात्पुरती शेड पाडली जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच याचिकेकडे प्रतिकूल दृष्टिकोनातून न पाहता सरकार म्हणून, सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार नाही अशी जागा शोधा, सुरक्षेशी तडजोड करायला सांगत नसल्याचेही न्यायालयाने सरकारला सुनावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com