बदलापूरप्रकरणी शाळेची चौकशी सुरू
बदलापूरप्रकरणी शाळेची चौकशी सुरू
विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक
बदलापूर, ता. २७ (बातमीदार) : बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका नामांकित खासगी शाळेच्या स्कूल बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा बसचालकाने विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याला एका दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. घटनेची दखल घेत शिक्षण विभागाने संबंधित शाळेत भेट देत शाळेची व शालेय व्यवस्थेची सखोल चौकशी सुरू केली आहे.
चौकशीत असे समोर आले की, खासगीरीत्या स्कूल बसने ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पालकांची असल्याचे हमीपत्र शाळेने आधीच पालकांकडून लिहून घेतले आहे. मात्र, केवळ अशा हमीपत्रावर शाळेची जबाबदारी संपते का, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या खासगी बस शाळेशी संलग्नपणे कार्यरत असतील, तर त्यांच्याबाबतही नियमावली, चालकांची पार्श्वभूमी तपासणी आणि सुरक्षाविषयक ठोस उपाययोजना शाळेकडून करण्यात याव्यात, अशी जोरदार मागणी पालक व नागरिकांकडून होत आहे. बदलापुरात वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे शहरातील वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रकरणाबाबत आरटीओ अधिकारी आशुतोष बारकुल यांच्याशी संपर्क साधला असता, संबंधित घटनेची त्यांना अद्याप कोणतीही अधिकृत माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, संबंधित पोलिस ठाण्याकडून माहिती घेऊन या स्कूल बसवरही कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. तसेच नियमभंग करणाऱ्या बसचे परवाने रद्द करण्यात आल्यानंतर व जप्त केलेली वाहने ठेवण्यासाठी पालिकेने आरटीओ विभागाला स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.
...
घटनेनंतर आम्ही शाळेला भेट देऊन माहिती घेतली. शाळा व शाळेच्या अधिकृत वाहनांची तपासणी केली असता ती सर्व नियमावलीनुसार असल्याचे आढळले. मात्र, पालकांनी आर्थिक सोयीनुसार निवडलेल्या खासगी वाहनांपर्यंत शिक्षण विभाग थेट पोहोचू शकत नाही. त्यामुळे पालकांनी महिला मदतनीस, चालकाची चारित्र्य पडताळणी तसेच त्याचे भूतकाळातील व वर्तमानातील वर्तन तपासूनच खासगी बसची निवड करावी.
- विशाल पोतेकर, गटशिक्षण अधिकारी, अंबरनाथ तालुका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

