बांधकाम व्यवसायिकाकडे खंडणीची धमकी
बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणीची धमकी
पाच कोटींची मागणी; ठाण्यातील आठवडाभरातील दुसरी घटना
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २७ : शहरात आणखी एका बांधकाम व्यावसायिकाला धमकावत त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. आठवडाभरातील ही दुसरी घटना असून, पहिल्या घटनेत बिश्नोई ग्रुपकडून १० कोटींची मागणी करण्यात आली आहे, तर दुसऱ्या घटनेत पाच कोटींची मागणी करण्यात आली आहे, पण मागणी करणाऱ्याने आपली ओळख स्पष्ट केलेली नाही; मात्र पोलिसात खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी खंडणीविरोधी पथक पुढील तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर बांधकाम व्यावसायिक हे घोडबंदर रोडवर हिरानंदानी इस्टेट परिसरात राहणारे असून, त्यांचे अंबरनाथ परिसरात विविध बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. २२ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे १.३४ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर अनोळखी क्रमांकावरून कॉल आला. क्रमांक संशयास्पद वाटल्याने त्यांनी कॉल स्वीकारला नाही. त्यानंतर त्यांनी त्याच्यावर कॉल करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क झाला नाही. दरम्यान, काही वेळाने त्याच क्रमांकावरून धमकीचे मॅसेज येण्यास सुरुवात झाली. त्यामध्ये पाच कोटी रकमेची मागणी करत शिवीगाळ व धमकी देण्यात आली. तसेच पोलिसात खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी तक्रारदार व्यावसायिकाने कासारवडवली पोलिस ठाण्यात धाव घेत लेखी तक्रार दिली. त्यानुसार अनोळखीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास ठाणे खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

