मोखाड्यात पुन्हा बिबट्याची दहशत

मोखाड्यात पुन्हा बिबट्याची दहशत

Published on

मोखाड्यात पुन्हा बिबट्याची दहशत

मोखाडा, ता. २७ (बातमीदार) ः गेल्या काही महिन्यांमध्ये बिबट्याने संपूर्ण मोखाडा तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. त्यानंतर बिबट्या दिसेनासा झाला होता; मात्र आता पुन्हा बिबट्याने बेरिस्ते येथे कुत्र्यांना फस्त केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रल्हाद राऊत आणि भास्कर राऊत यांच्या पाळीव कुत्र्यांची बिबट्याने शिकार केल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. मोठी घटना घडल्यानंतर वनविभागाला जाग येणार का, असा संतप्त सवाल ग्रामस्थ राहुल राऊत यांनी उपस्थित केला आहे. याबाबत वनक्षेत्रपाल विनोद दळवी यांनी सांगितले, की आमचे कर्मचारी रात्रंदिवस तिथे गस्त घालत आहेत. आम्ही लोकांना सावध करीत आहोत. लवकरच तिथे वरिष्ठांची परवानगी घेऊन पिंजरा लावणार आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com