बुलेट ट्रेनच्या ठाणे, विरार स्थानक परिसराचा एमएमआरडीए करणार विकास

बुलेट ट्रेनच्या ठाणे, विरार स्थानक परिसराचा एमएमआरडीए करणार विकास

Published on

ठाणे, विरार स्थानक परिसराचा विकास होणार
बुलेट ट्रेन प्रकल्प; एमएमआरडीए, केंद्र सरकार आणि जायकाची बैठक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : मुंबई-अहमदाबाद दरम्यानच्या बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत राज्यात बीकेसी, ठाणे, विरार आणि बोईसर ही चार स्थानके असणार आहेत. त्यापैकी ठाणे आणि विरार या दोन स्थानक परिसराचा स्थानक क्षेत्र विकासासाठी प्रकल्पांतर्गत (स्मार्ट) विकास केला जाणार आहे. त्यासाठी एमएमआरडीए, केंद्रीय अधिकारी आणि जपानच्या जायका कंपनीच्या अधिकारऱ्यांची शुक्रवारी एमएमआरडीएच्या वांद्रे येथील मुख्यालयात उच्चस्तरीय बैठक झाली.
बुलेट ट्रेनचे काम अनेक ठिकाणी अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे बुलेट ट्रेन कार्यान्वित झाल्यानंतर या मार्गिकेवर असलेल्या स्थानक परिसरात प्रवाशांची गैरसोय होऊ नये, वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात येत असलेल्या चार स्थानकांपैकी ठाणे आणि विरार या दोन स्थानकांच्या परिसराचा विकास करण्याबाबत प्राधान्याने निवड करण्यात आली आहे. त्यानुसार झालेल्या बैठकीत जायकाच्या तज्ज्ञांनी जपानमधील ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट, जमीन मूल्य हस्तगत, एकात्मिक वाहतूक नियोजन, पर्यावरणीय शाश्वतता, हितधारक सहभाग आणि स्थानकाभोवती पुनरुत्थानात खासगी क्षेत्राच्या सहभागासंबंधी आंतरराष्ट्रीय उत्तम पद्धती सादर केल्या.

कृती मार्ग नकाशा
एमएमआरडीएच्या नगररचना पथकाने व जायका तज्ज्ञांनी ठाणे व विरार स्थानक क्षेत्र विकास आराखड्यांवर सविस्तर चर्चा करून नियोजन आराखडा, अंमलबजावणीचा कृती मार्ग नकाशा व पुढील टप्प्यातील आंतरसंस्थात्मक समन्वय यावर विचारविनिमय केला. त्यामुळे दोन्ही स्थानकाच्या परिसरातील विकासकामांना लवकरच वेग येणार आहे. तसेच भविष्यात बीकेसी व बोईसर स्थानक परिसराचा विकास केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com