वीज बचतीसाठी टाटा पॉवरची सेन्सर आधारित प्रणाली

वीज बचतीसाठी टाटा पॉवरची सेन्सर आधारित प्रणाली

Published on

सेन्सर आधारित प्रणाली
वीज बचतीसाठी टाटा पॉवरचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : टाटा पॉवरने मुंबईत आपल्या स्मार्ट ऊर्जा व्यवस्थापन उपक्रमाचा विस्तार करत टाटा पॉवर ईझेड होमद्वारे वीज बचतीसाठी व्यावसायिक आणि औद्योगिक इमारतींसाठी स्मार्ट लाइटिंग आणि ऑटोमेशन प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे कार्यालयात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी कोणी उपस्थित नसेल, तर सेंसरच्या मदतीने विजेवरील दिव्यांचा प्रकाश कमी होणार आहे. त्यामुळे वीज बचतीला चालना मिळणार आहे.
उद्योगांच्या ठिकाणी मोठ्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात वीज प्रकाश व्यवस्थेवर खर्च होते. त्यामुळे जास्त वर्दळ असलेल्या इमारतींमधील वीज वापर नियंत्रित करणे करण्यासाठी टाटा पाॅवरने टाटा पॉवर ईझेड होमद्वारे वीज वापर नियंत्रित करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. सेन्सर-आधारित लाइटिंग प्रणाली अनुपस्थितीच्या काळात प्रकाशाची तीव्रता २० टक्क्यांपर्यंत कमी करून अनावश्यक वीज वापर टाळते. या प्रणालीमुळे दीर्घ किंवा सलग कार्यरत असलेल्या सुविधा केंद्रांमध्ये वीज बचत होऊ शकणार आहे. मुंबईत टाटा पॉवरने ईझेड होम स्मार्ट लाइटिंग आणि ऑटोमेशन प्रणाली ओएनजीसी (बीकेसी), कोटक महिंद्रा बँक (बीकेसी), यूटीआय टॉवर (बीकेसी), फिनिक्स पॅलेडियम (लोअर परळ), फिनिक्स मार्केट सिटी (कुर्ला), इन्फिनिटी वन (मालाड) आणि ताज वेलिंग्टन (कुलाबा) येथे बसवली आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com