एसआरए एचडीआयएलमधील भाड्याची जागा खरेदी करणार

एसआरए एचडीआयएलमधील भाड्याची जागा खरेदी करणार

Published on

‘ती’ जागा खेरदी करणार!
एसआरए, एचडीआयएलमधील जागेबाबत हालचाली
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) लवकरच वांद्रे पूर्व येथील एचडीआयएल टाॅवरमध्ये एक मजला खरेदी करणार आहे. सध्या या ठिकाणी एसआरएचे १२ उपजिल्हाधिकारी बसत असून, ती जागा भाडेतत्त्वावर घेतली आहे. त्याला मोठ्या प्रमाणात भाडे मोजावे लागत असल्याने सदरची जागा खरेदी करण्याच्या हालचाली एसआरएने सुरू केल्या आहेत.
वांद्रे पूर्व येथे एसआरए प्राधिकरणाचे मुख्यालय असले तरी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यामध्ये बसण्यासाठी पुरेशी जागा नाही. त्यामुळे एसआरएने शेजारीच असलेल्या एचडीआयएलमधील एक मजला भाड्याने घेतला आहे. त्यामध्ये उपजिल्हाधिकारी आणि त्यांच्याशी संबंधित अधिकारी-कर्मचारी बसतात. त्यासाठी लाखो रुपये भाडे महिन्याला मोजावे लागते. त्यामुळे भाडे भरण्यापेक्षा सदरची जागाच खरेदी करण्याच्या हालचाली एसआरएने सुरू केल्या आहेत. त्याबाबतचा प्रस्ताव लवकरच राज्य सरकारकडे पाठवला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com