भूमिसेना-आदिवासी एकता परिषदेचा लॉंग मार्च
भूमिसेना-आदिवासी एकता परिषदेचा लाँग मार्च
मनोर, ता. २७ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी भूमिसेना-आदिवासी एकता परिषदेच्या वतीने चहाडे नाका ते टाकवहाळ येथील मुंबई-अहमदाबाद महामार्गालगतच्या ट्रॉमा केअर रुग्णालयापर्यंत लाँग मार्च काढण्यात आला. शुक्रवारी सकाळी ११ वाजता चहाडे नाका येथील क्रांतिसूर्य बिरसा मुंडा चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. मनोरमार्गे काढलेल्या या मार्चचे सभेत रूपांतर ट्रॉमा केअर रुग्णालय परिसरात झाले.
या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक, बांधकाम, पाणीपुरवठा व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मनोर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. पालघर हा आदिवासीबहुल जिल्हा असूनही अपुऱ्या आरोग्य सुविधा असल्याचा आरोप करण्यात आला. महामार्गावरील ट्रॉमा केअर सेंटरचे बांधकाम पूर्णत्वास येऊनही ते कार्यान्वित झालेले नाही. नंडोरे येथील जिल्हा सामान्य रुग्णालय अपुरे पडत असून ग्रामीण रुग्णालये व माता-बाल संगोपन केंद्रांची अवस्था बिकट आहे. आवश्यक मनुष्यबळ, तज्ज्ञ डॉक्टर व उपकरणांसाठी निधी उपलब्ध नसल्याने रुग्णांना जीव गमवावा लागत असल्याचे सांगितले.
-----
योजना अपूर्ण; पाणीटंचाई कायम
जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजना अपूर्ण असून, ग्रामीण भागात टंचाई कायम आहे. ट्रॉमा केअरचे ९५ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती उपविभागीय अभियंता अजय जाधव यांनी दिली. १२० कोटींची मान्यता असून, ६६ कोटी वर्ग झाल्याचे डॉ. रामदास मराड यांनी सांगितले. मार्चमध्ये दत्ता करबट, परशुराम चावरे यांसह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

