हिंद दी चादर कार्यक्रमात साधू संतांची मांदियाळी
‘हिंद दी चादर’मध्ये साधूसंतांची मांदियाळी
खारघरमध्ये कार्यक्रम; ३१० बसची सोय
खारघर, ता. २७ (बातमीदार) : खारघरमध्ये होणाऱ्या ‘हिंद दी चादर’ कार्यक्रमात विविध राज्यांतील साधू-संत सहभागी होणार असून, मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, कर्जत आणि पनवेल परिसरातून कार्यक्रमासाठी सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी बेस्ट, टीएमटी, केडीएमटी आणि एनएमएमटीच्या ३१० बस उपलब्ध असणार आहेत.
श्री गुरू तेग बहादूरजी यांच्या ३५०व्या शहिदी समागमनिमित्त खारघरमध्ये ‘हिंद दी चादर’ या कार्यक्रमात शनिवार आणि रविवारी राज्यातील साधू-संत सहभागी होणार आहेत. शनिवार सकाळी ८ ते रात्री १० या वेळेत भजन, कीर्तन, प्रवचन आदी विविध कार्यक्रम होणार असून, या कार्यक्रमात संत ज्ञानी हरिनाम सिंग, धर्मगुरू डॉ. बाबूसिंग महाराज, सिंग साहिब कुलवंत सिंग, पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री, साध्वी ऋतुंभरा, महंत रघु मुनीज, सतीश बाबा बलविंदर सिंग, जस्किरत सिंग, संजय महाराज पाचपोर, रामसिंग महजर, रिंकू वीरसिंग, संत गोपाळ चैतन्य, साई कालीराम सहभागी होणार आहे. या कार्यक्रमाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच उत्तर प्रदेश, गोवा अशा विविध राज्यांतील मुख्यमंत्री या कार्यकमात सहभागी होणार आहेत. शनिवार आणि रविवार मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबविली, कर्जत आणि पनवेल परिसरातून कार्यक्रमासाठी सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी बेस्ट, टीएमटी, केडीएमटी आणि एनएमएमटीच्या ३१० बस उपलब्ध असणार आहेत. कार्यक्रमासाठी येणाऱ्या भाविकांसाठी लंगरची सोय उपलब्ध असणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

