‘एकत्रित प्रयत्नातून यशाची खात्री’
‘एकत्रित प्रयत्नांतून यशाची खात्री’
पालघर (बातमीदार) ः केंद्र शासन किंवा राज्य शासनाने योजनांच्या निकषांप्रमाणे काम करणे अत्यावश्यक आहे. त्याचप्रमाणे या योजना प्रभावीपणे राबवणे ही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांची सामूहिक जबाबदारी आहे. सर्वांनी एकत्रित प्रयत्न केल्यास योजनांची अंमलबजावणी यशस्वीपणे करता येईल, असे प्रतिपादन खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी केले. केंद्र शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची (दिशा) बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या बैठकीला आमदार राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव डॉ. इंदुराणी जाखड, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, प्रकल्प संचालिका (जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा) डॉ. रूपाली सातपुते, प्रकल्प अधिकारी जव्हार आणि डहाणू, पालघर, वाडा, विक्रमगड, नगराध्यक्ष तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

