८१९ शिक्षण सेवकांची नियुक्ती

८१९ शिक्षण सेवकांची नियुक्ती

Published on

८१९ शिक्षण सेवकांची नियुक्ती
मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांची माहिती
पालघर, ता. २८ (बातमीदार) ः पेसा क्षेत्रासाठी अनुसूचित जमाती प्रवर्गातील शिक्षण सेवकपदे रिक्त होती. या पदांवर ८१९ जणांची भरती पारदर्शक पद्धतीने पूर्ण करून उमेदवारांना नियुक्ती केल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी केले.
खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील, शिक्षणाधिकारी प्राथमिक सोनाली मातेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्ती आदेशांचे वितरण करण्यात आले. या निर्णयामुळे पेसा क्षेत्रातील शिक्षण व्यवस्थेला बळकटी मिळणार असून स्थानिक अनुसूचित जमातीतील पात्र उमेदवारांना न्याय मिळाला आहे. पेसा क्षेत्रातील भरतीसंदर्भात २०२३ मध्ये सर्वोच्च न्यायालयात प्रकरण दाखल झाले होते. त्यानंतर ५ ऑक्टोबर २०२४च्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार उमेदवारांना मानधन तत्त्वावर कार्यरत ठेवण्यात आले होते. या भरतीप्रक्रियेत रिक्त पदांच्या ८१९ पदे भरण्यात आली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com