सांस्कृतिक परंपरेचे ग्रंथदिंडीतून दर्शन

सांस्कृतिक परंपरेचे ग्रंथदिंडीतून दर्शन

Published on

सांस्कृतिक परंपरेचे ग्रंथदिंडीतून दर्शन
नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या शाळांमध्ये उत्साह
विरार, ता. २८ (बातमीदार) ः मराठी भाषा गौरव दिनानिमित्त नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या चारही शाळांमध्ये पारंपरिक, सांस्कृतिक उपक्रमांनी नटलेला मराठी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मराठी भाषेचा गौरव, संस्कृतीचे जतनाचा संदेश कार्यक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात आकर्षक ग्रंथदिंडीने झाली. विद्यार्थ्यांनी हातात पुस्तके व मराठी भाषेचा गौरव करणारे फलक घेऊन शाळा परिसरात दिंडी काढत मराठी भाषेबद्दलचा अभिमान व्यक्त केला. विविध पारंपरिक उपक्रम करण्यात आले. पालखी पूजनातून संस्कृतीचे दर्शन घडवण्यात आले. विद्यार्थ्यांनी जोशपूर्ण शिवगर्जनेतून वातावरणात उत्साह जागवला. पारंपरिक लेझीम सादरीकरणाने कार्यक्रमाला रंगत आली. नृत्य, पोवाडा आणि भारूड यांसारख्या लोककला सादर करून मराठी संस्कृतीची समृद्ध परंपरा उलगडली. कविता सादरीकरणातून मराठी भाषेचे सौंदर्य प्रभावीपणे मांडण्यात आले. या वेळी
पारंपरिक वेशभूषेत विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक व सांस्कृतिक व्यक्तिरेखा साकारून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षिका समिधा वजे, निवेदिता कांमळी, छाया शिंदे, शालन वनमाळी, वृंदा म्हात्रे यांनी योगदान दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com