जलमार्गाने प्रवास सुखकर
जलमार्गाने प्रवास सुखकर
जलसार ते मारंबळपाडा यादरम्यान एक लाख प्रवाशांचा टप्पा पार
पालघर, ता. २७ (बातमीदार) : महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या जलसार जेटी (सफाळे) ते मारंबळपाडा (विरार) या जलमार्गावरील जलवाहतुकीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या १० महिन्यांत या सेवेद्वारे एक लाखाहून अधिक प्रवाशांसह ७८ हजार ४६० वाहने आणि सात हजार ५४५ जनावरांची सुरक्षित वाहतूक करण्यात आली. या जलमार्गामुळे वसई व पालघर तालुके थेट जोडले गेले असून, दोन्ही भागांतील प्रवाशांना जलद व सोयीस्कर पर्याय उपलब्ध झाला आहे.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील काँक्रीटीकरणाच्या कामामुळे वारंवार होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी जलमार्गाला प्राधान्य दिले आहे. पूर्वी भाईंदर-नायगाव खाडीवर पूल उभारण्याची तसेच विरारजवळील नारिंगी ते सफाळे परिसर जोडणाऱ्या पुलाची मागणी करण्यात आली होती; मात्र निधीअभावी तो प्रकल्प रखडला. परिणामी या जलमार्ग सेवेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. एप्रिल २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत जलसार-मारंबळपाडा मार्गावर प्रवासी व मालवाहतूक सुरळीत पार पडली. महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडून प्रवासी सुरक्षा, वेळेचे काटेकोर पालन आणि सुविधा सुधारणा यांना प्राधान्य दिले जात असून, सेवा अधिक सक्षम करण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. प्रवाशांनी तिकीट घेऊनच प्रवास करावा, अन्यथा कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
-------------
महामार्गावर कोंडी झाल्यास अनेक प्रवासी, खासगी वाहने, मालवाहतूक आणि अवजड वाहने जलमार्गाचा पर्याय निवडताना दिसून आली.
या आकडेवारीवरून जलसार-मारंबळपाडा बंदरातून प्रवासी तसेच मालवाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. जलमार्ग सेवा सुरक्षित, जलद आणि किफायतशीर पर्याय ठरत असल्याने नागरिकांचा कल या सेवेकडे वाढत आहे.
-----------------
कालावधीतील वाहतुकीचा तपशील :
एकूण प्रवासी : १,००,९६३
दुचाकी : ५६,८६३
कार : ३,३२०
ऑटो रिक्षा : १८,०७९
अवजड मालवाहतूक : २,४२१
मेंढी / शेळी : ७,३६७
गाई / म्हशी / बैल : ५२
इतर वाहने : १२६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

