गप्पा-गोष्टी, मुलाखतीमुळे रंगत
गप्पा-गोष्टी, मुलाखतीमुळे रंगत
वसई-विरार पालिकेतर्फे मराठी भाषा दिन साजरा
विरार, ता.२८ (बातमीदार)ः वसई विरार शहर पालिका प्रभाग समिती एच नवघर-माणिकपूर डॉ.के.ब. हेडगेवार सार्वजनिक वाचनालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त गप्पा-गोष्टी, मुलाखतीचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात मराठीतील ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, लेखक विजय केंकरे, ज्येष्ठ संवाद लेखीका रोहिणी निनावे, डबिंग आर्टिस्ट, मराठी भाषा मार्गदर्शक प्रसाद फणसे यांचा सहभाग होता.
मराठी भाषेच्या विविध पैलूंवर चर्चा करण्यात आली. मराठी भाषेतील कथा, कविता इ.सर्व प्रकाराचे साहित्य मोठ्या प्रमाणात वाचावे, असे आवाहन विजय केंकरे यांनी केले. तसेच सोशल मिडिया येथे फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात मराठी मालिकांमधील भाषेचा दर्जा घसरत चालला आहे, तो सुधारण्याची गरज असल्याचे रोहिणी निनावे यांनी व्यक्त केली. यावेळी कविता वाचनातून त्यांनी उपस्थितांची दाद मिळवली. त्याचप्रमाणे विनोदी शैलीत प्रसाद फणसे यांनी डबिंग करतेवेळी मराठी भाषेतील विविध शब्दाचे, वाक्यांचे वेगवेगळे अर्थ याविषयीचे किस्से सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महापौर अजीव पाटील, विशेष अतिथी उप-महापौर मार्शल लोपीस, आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी (भा.प्र.से.), सभागृह नेते प्रफुल्ल साने, विरोधी पक्ष नेते मनोज पाटील, माजी महापौर नारायण मानकर, माजी परिवहन सभापती भरत गुप्ता यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

